– सरकारविरोधातील घोषणांनी दणाणला संगम चौक!
बुलढाणा (राजेश लोखंडे) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज (दि.२९) सकाळी पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथील संगम चौकात राज्यातील फडणवीस-पवार सरकारने लागू केल्या हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी संगम चौक दणाणून गेला होता.
मराठी ही केवळ भाषा नसून, आपला अभिमान आणि आपली संस्कृती आहे. त्यामुळे मराठीला डिवचण्याचा प्रयत्न आम्ही शिवसैनिक खपवून घेणार नाही. हिंदी सक्तीबाबतचा निर्णय आम्हाला मान्य नाही. बळजबरीने लादण्याचा कुणी प्रयत्न करु नये. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, जशास तसे उत्तर देऊ. महाराष्ट्रात चालेल तर फक्त मराठी. इतर भाषांचा आम्ही सन्मान करतो. मात्र आमच्या संस्कृतीवर हल्ला सहन केला जाणार नाही, अशा संतप्त भावना याप्रसंगी शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी हिंदी सक्तीच्या महाराष्ट्र शासनाच्या जीआरची होळी करून निर्दशने व निषेध करण्यात आला. त्यानंतर हिंदी भाषा सक्तीची करण्यात येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, पक्ष प्रवक्त्या सौ.जयश्रीताई शेळके, विजयाताई खडसन, युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कर्हाडे, डी एस लहाने सर, लखन गाडेकर, विजुभाऊ इंगळे, माजी पंचायत समिती सभापती सुधाकर आघाव, विजय इतवारे, प्रकाश डोंगरे, अशोकमामा गव्हाणे, आशीष बाबा खरात, बबन खरे, श्याम खडके, श्याम सावळे, शेख रफिक, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, संजय दर्डा, हरिभाऊ शिनकर, एकनाथ कोरडे, संजय गवळी, संजय शिंदे, गजानन उबरहंडे, राहुल जाधव, रामू राजपूत, गणेशसिंग जाधव सर, वसीम सय्यद, पृथ्वीराज राजपूत, तानाजी पैठणे, दत्ता जाधच तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
————-