– बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून पीआय, एपीआय यांच्या बदल्यांचे आदेश जारी
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी घाटाखालील पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांच्या नियुत्तäया केल्या असून, जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने ही पदे रिक्त होत होती. तसेच, जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांना कार्यमुक्तदेखील करण्यात आले आहे. त्यानुसार आता, खामगाव ग्रामीणच्या ठाणेदारपदी किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते नियंत्रण कक्षात कार्यरत होते. यासह, नांदुरा ठाणेदारपदी जयवंत सातव, मलकापूर ग्रामीण ठाणेदारपदी सतिश महल्ले, व बोराखेडी ठाणेदारपदी सीताराम मेहेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व पोलिस निरीक्षक बुलढाणा नियंत्रण कक्षातच कार्यरत होते.
बुलढाणा जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक २१ जूनरोजी पार पडली होती. या बैठकीत ठाणेदारांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानुसार, काल, दि. २१ जूनरोजी बदल्यांचे व कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, एपीआय संदीप काळे हे मलकापूर ग्रामीण येथे दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत राहणार असून, बुलढाणा नियंत्रण कक्षातील पीएसआय किरण खाडे यांची शिवाजीनगर पोलिस ठाणे व पीएसआय शिल्पा सुरगडे यांची दोषसिद्धी विभाग येथे बदली करण्यात आली आहे. तसेच, दोषसिद्धी विभाग बुलढाणा येथील एपीआय प्रमोद इंगळे यांची सायबर पोलिस ठाणे बुलढाणा येथे प्रभारी अधिकारी पदी बदली करण्यात आली असून, एपीआय संजय पवार यांची नांदुरा येथे बदली करण्यात आली आहे, ते बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत होते. एपीआय हेमंत शिंदे यांची देऊळगावराजा येथून सिंदखेडराजा येथे बदली करण्यात आली आहे. या शिवाय, पोलिस निरीक्षक ब्रम्हदेव शेळके यांची जळगाव, सारंगधर नवलकर यांची नंदूरबार व विलास पाटील यांची वर्धा येथे बदली झाल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
बदल्यांचे आदेश वाचण्यासाठी येथे क्लीक करा...