– ‘राष्ट्रवादी’च्या महिला जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे यांचा शिंदे गटात प्रवेश!
– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड यांची उपस्थितीत प्रवेश सोहळा
बुलढाणा (राजेश लोखंडे) – मुंबई येथे शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. अनुजाताई सावळे पाटील यांच्यासह शिवसेना (ठाकरे) महिला आघाडी प्रमुख सौ.जिजाताई राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गट महिला सरचिटणीस सौ.सरलाताई बाहेकर यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
या महिला नेत्यांसह बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जयकुमार सरकटे, अरूण अंभोरे, दीपाली पवार, विश्रांती जाधव, विजय राठोड, संगीता पवार, सौ. दीपाली वायचोळ आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, शिवसेना सचिव संजय मोरे आणि शिवसेना प्रवत्तäया प्रा.ज्योती वाघमारे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.