– सुशांत गुप्ता यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी!
चिखली ( प्रताप मोरे ) : एस जी अनलेटिक्स प्रा लि कम्पनी पुणे या संस्थेचे सर्वेसर्वा व फाउंडर अँड चेअरमन सुशांत गुप्ता यांच्या प्रेरणेतून खैरव येथील जि. प. शाळेला सात संगणक संच भेट दिले व आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
चिखली तालुक्यातील खैरव जि. प. शाळेवर शिक्षक पदावर कार्यरत असलेले दिनेश पडघान यांचे बंधू उमेद पाटील हे पुणे येथे एसजी अनलेटिक्स प्रा लि कम्पनी मध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. त्यांनी पडघान सर यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती व तंत्रज्ञान युगातील संगणकाची शैक्षणिक गरज लक्षात घेता सदर कंपनी कडे संगणकसंच देण्याची मागणी केली आणि त्यांची मागणी संस्थेचे सर्वेसर्वा व फाउंडर अँड चेअरमन सुशांत गुप्ता यांनी लगेच मान्य करून शाळेसाठी सात संगणक संच देण्याचा निर्णय घेतला. आणि स्वतःकंपनीचे चेयरमन सुशांत गुप्ता यांनी खैरव येथे येवून शाळेला सात संगणक संच भेट दिले. त्यामुळे शालेय व्यवस्थापण समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावकर्यांनी कंपनीचे चेयरमन गुप्ता व कम्पनीच्यावतीने उमेद पाटील यांचही सत्कार केला. यावेळी केंद्रप्रमुख केवट, सरपंच सौ अश्विनी शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजराव शिंदे, मुख्याध्यापक सुनील गवई, ,शिक्षक वसुदेव जाधव,दिनेश पडघान ,सुनील इंगळे ,येवलें मॅडम,तनपुरे मॅडम,सुनील साळवे व गावकरी हजर होते.