– जाफ्राबाद रोडवरील भोकारवाडीजवळील भीषण अपघात
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली – जाफ्राबाद रोडवरील भोकारवाडी गावाजवळ भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन तरूणांचा जागीच मृत्यू, तर एका तरुणाला रूग्णालयात हलविताना त्याचादेखील दुर्देवी मृत्यू झाला आहे. आज (दि.२५) दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान हा अपघात झाला. तिघे तरुण पल्सर मोटारसायकलने कुंभारी येथे जात होते, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर असे, की पळसखेड दौलत गावाच्यासमोर असलेल्या भोकरवाडीजवळ दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान ही भीषण घटना घडली. सदर तरुण हे चिखलीकडून वरुडकडे जात होते. रस्त्यावर पडलेल्या गचक्यात भरधाव दुचाकी जाऊन ती अनियंत्रित होऊन झाडावर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. ही धडक इतकी तीव्र होती की दुचाकी एमएच १५ – ०७५७ क्रमांकाच्या पल्सर वाहनाने रोहित महादू चाबूकस्वार (२४), शुभम रमेश चाबूकस्वार (२५), सोनू सुपडू उसरे (२३) या तिघा तरुणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण चिंताजनक स्थितीत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता, तोसुद्धा मरण पावला. या अपघाताची माहिती मिळताच, चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेले तिघेही तरुण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील राहणारे आहेत.