– वाळूतस्करांना महसूल विभागाचे दणके सुरूच; अवैध रेती उपसा करणार्यांचे कंबरडे मोडले!
चिखली (प्रताप मोरे) – तालुक्यातील इसरूळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून बोटींद्वारे अवैध वाळूउपसा करणार्या वाळूतस्करांना महसूल विभागाने आज (दि.२५) चांगलाच दणका ठेवून दिला महसूल पथकाने दिवसभर शोधमोहीम राबवून इसरूळ येथे नदीपात्रात चार बोटी पकडल्या, तर काही बोटी पळून गेल्यात. पकडण्यात आलेल्या चारही बोटी स्फोटके लावून उडवून देण्यात आल्या आहेत.
खडकपूर्णा नदीपात्रातून चालणारी रेतीतस्करी ही मोठीच समस्या होऊन बसली आहे. वाळूतस्करांवर कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अंढेरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी हे सर्व आज मैदानात उतरले होते. या पथकाने इसरूळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात कारवाईसत्र राबवले. त्यात चार बोटी पकडण्यात आल्या, त्यांना स्फोटकांच्या सहाय्याने उडवून नष्ट करण्यात आले. शोधमोहिमेला सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, देऊळगावराजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचेदेखील सहकार्य लाभले.