– मेहकरात ग्रामसेवक संघटनेचे काळयाफिती लावून कामकाज!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी डी. टी. तांबारे हे कर्तव्यावर असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सदर घटनेचा निषेध म्हणून तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांना दि.१३ मार्च रोजी निवेदन देऊन काळयाफिती लावून कामकाज करण्यात आले.
याबाबत संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोणगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी डी. टी. तांबारे हे दि. १२ मार्च रोजी कर्तव्यावहर हजर असताना डोणगाव येथीलच तौफिक शहा कट्टू शहा या इसमाने ग्रामपंचायत कार्यालय येऊन दारूच्या नशेत ग्रामपंचायत अधिकारी तांबारे यांच्याशी हुज्जत घातली व त्यांच्यावर प्राणघातक हल्लादेखील केला. या घटनेचा निषेध करत ग्रामसेवक संघटनेने गटविकास अधिकारी उमेश देशमुख अधिकारी यांना परवा, दि. १३ मार्च रोजी निवेदन दिले व काळ्याफिती लावून कामकाजदेखील केले. यामध्ये संघटनेचे तालुकाध्यक्ष डी. बी. काळे, सचिव एस. पी. शिंदे, तसेच ए.डी. राऊत, डी.एस. जऊळकर, कु.एस.बी. खिल्लारे, एस. टी. काळे, एस बी वानखडे, टी. आर.धोंडगे, जी. जी. म्हस्के, पी.एम. झाल्टे, एस. व्ही. रिंढे, सु.ना.पाणेड, पी.एच. भुरकाडे यासह असंख्य ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते.