LATUR

रेणापूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील ७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र दिनांक २८ जून २०२२ अन्वये लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रामवाडी ख, रामवाडी पा, नरवटवाडी, पानगांव व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, आनंदवाडी, तुरुकवाडी अशा एकूण ०७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी निवडणूक दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळे पूर्वीच्या ४८ तासांमध्ये मद्यविक्री करण्यासा मनाई / कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) नुसार तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे बंधन आहे. दिनांक ०२ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर सायं. ५.३० वाजेपासून बंद क्षेत्र लातूर जिल्ह्यातील तालुक्यातील रामवाडी ख, रामवाडी पा, नरवटवाडी, पानगांव व शिरु अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, आनंदवाडी, तरुकवाडी ग्रामपंचायत हद्द. दि. ०३ ऑगस्ट २०२२ रोजी मतदानाच्या पुर्वीचा दिवस पुर्ण दिवस बंद, दि. ०४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदानाचा दिवस सायं. मतदान प्रक्रीया संपेपर्यंत, दि. ०५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणीचा दिवस, बंद कालावधी मतमोजणी कार्यक्रम संपेपर्यंत राहील. उक्त नमूद केल्याप्रमाणे आदेशति करण्यात आलेल्या बंद कालावधीत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रामवाडी ख, रामवाडी पा, नरवटवाडी, पानगांव व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, आनंदवाडी, तुरुकवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ज्या अनुज्ञप्ती आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येईल, अशा संबंधीत अनुज्ञप्तीधारकांची ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती करयमस्वरुपी रद्द करण्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र दारु बंदी कायदा १९४९ अंतर्गत नमूद तरतुदीन्वये संबंधीत अनुज्ञप्तीधारकांवर फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!