– आ. श्वेताताई महाले व विद्याधर महाले यांचीही लाभली उपस्थिती
चिखली (तालुका प्रतिनिधी) – संत खडकेश्वर महाराज संस्थान येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी व वंजारी समाज मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. याप्रसंगी मोठ्या संख्येने वंजारी समाज बांधव एकवटले होते.याप्रसंगी हभप श्री अशोक महाराज पवळ यांनी प्रवचन करून समाजाला योग्य असे मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशआप्पा खबुतरे तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केशवराव नागरे, गजानन मुंढे, रघुनाथ पवळ, श्रीधर पवळ, उद्धव वाघ, विनोद वाघ, जितेंद्र कापसे, बळीराम काळे, देवानंद वाघ, विशाल धारणकर, शैलेशभाऊ कापसे, सुनील धुंदळे, संजय घुगे, गजानन काळुसे, गजानन सानप, संजय वाघ, सचिन गीते, तेजीराव काळे, सचिन वाघ, सुशील वाघ यांनी प्रयत्न केले व चिखली तालुक्यातील सर्व वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पवळ यांनी केले तर प्रस्ताविक गजानन मुंढे यांनी केले. मनोगत केशवराव नागरे, शार्दुल कापसे, सौ सोनाली मुढे व सौ घुगे ताई यांनी व्यक्त केले. नारायणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. आभार प्रदर्शन शार्दुल कापसे यांनी केले व नंतर स्नेहाभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.