आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागर दुर्गसंवर्धनाचा, जागर इतिहासाचा या ध्येय आणि उद्देशाने कायम शिव कार्यासाठी दुर्गजागर प्रतिष्ठान नेहमी तत्पर असतो. आजपर्यंत प्रतिष्ठानकडून खूप किल्ल्यांवर स्वच्छता व दुर्ग संवर्धनाचे काम सुरू असून, असेच शिवविचारांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने गडकिल्ले संवर्धन व अभ्यास मोहिमे अंतर्गत किल्ले मल्हारगड स्वच्छता मोहीम शिवमय उत्साहात राबविण्यात आली.
अशीच मोहीम सासवड येथील काळेवाडी जवळील किल्ले मल्हारगड / सोनारीचा किल्ला येथे स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. यावेळी दुर्गजागरच्या मावळ्यांनी किल्ले मल्हार गडावरील तलावाच्या तटबंदी चे दुरूस्तीचे व तटबंदीच्या दरवाजातील गवत साफ सफाईचे सामाजिक कार्य करीत उपक्रम यशस्वी केला. या स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानचे मावळे, रणरागिणी त्याचबरोबर बालमावळे ही उत्साहात सहभागी झाले होते. तलावाजवळील तटबंदीच्या दुरूस्तीचे काम यावेळी करण्यात आले. या मोहिमेत मल्हारगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी पुणे दुर्गजागर प्रतिष्ठानचे मावळे, रणरागिणी त्याचबरोबर बालमावळे यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply