चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद कैलास भारत पवार यांना वीरगती प्राप्त होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने ३० जुलै रोजी प्रथम शहीद दिनानिमित्त त्यांना आदरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सियाचीन मध्ये देशाच्या सीमेवर खडा पहारा देणारे चिखली येथील कैलास भारत पवार हे लष्करी जवान सुट्टीवर घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. कैलास पवार हे २ ऑगस्ट २०२० पासून-३- महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यांची सियाचीनमधील ड्युटी एक ऑगस्ट २०२१ ला संपली होती. त्यामुळे ते सुट्टीवर घरी येत होते. व आपल्या सहकार्यासह सियाचीन ग्लेशीवरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत असताना कोसळले व त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त शनिवार ३० जुलै रोजी चिखली येथील गजानन नगर बुद्ध विहाराजवळ शहीद कैलास पवार यांना आदरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन सकाळी१० वाजता करण्यात आले आहे. तरी या आदरांजली पर कार्यक्रमात आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद कैलास पवार फाउंडेशन तथा समस्त चिखलीकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply