कर्जत (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात “हर घर तिरंगा” या अभियानासाठी करावयाच्या तयारीची आढावा बैठक कर्जत तालुका भाजपच्या वतीने आ. प्रा. राम शिंदे (उपाध्यक्ष, भाजप प्रदेश, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि२९ जुलै रोजी कर्जत येथील आराधना भवन येथे पार पडली. स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल देशात अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी “हर घर तिरंगा” हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, त्या संबंधीचे मार्गदर्शन जिल्हा सरचिटणीस व कर्जत तालुका प्रभारी बाळासाहेब महाडीक यांनी केले.
आ. प्रा राम शिंदे यांनी आढावा घेताना सांंगितले कि, हे अभियान भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे, भाजपाचे अध्यक्ष नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने योग्य ती जागृती करून प्रत्येक घरावर आदर्श ध्वज संहितेप्रमाणे हा ध्वज लावावा, हे अभियान राबविताना ध्वजाच्या संहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी कार्यकर्त्यानी घ्यावी. निष्ठावंतावर अन्याय होणार नाही, आता रामाचा वनवास संपलेला आहे, काही लक्ष्मण वनवासात बरोबर राहिले नाही त्यामुळे त्यांचा वनवास सुरू झाला आहे. आता तुम्हीच सर्वजण राम आहात असे म्हणताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व टाळ्याचा कडकडाट केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे हे होते. सभेचे प्रास्ताविक तालुका सरचिरटणीस शेखर खरमरे यांनी केले, हे अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी, विविध आघाड्याचे प्रमुख यांनी जनजागृती करून त्याचे फोटो अपलोड करावेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाकडून किंवा तहसील कार्यालयातून ध्वज घ्यावा असे आवाहन करण्यात आले. सुत्रसंचालन उमेश जेवरे यांनी केले तर आभार तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड यांनी मानले. बैठकीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरेे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर, तालुकाध्यक्ष सुनील गावडे, प्रकाश काका शिंदे, काकासाहेब धांडे, अॅड बाळासाहेब शिंदे, सुनील यादव, गणेश क्षीरसागर, दादासाहेब सोनमाळी, दत्ता पिसाळ, गणेश पालवे, शरद मेहेत्रे, सुनील काळे, तात्यासाहेब माने, संपत बावडकर, अनिल गदादे, डॉक्टर विलास राऊत, संकेत पाटील, अश्विनी दळवी, आशा वाघ, मनीषा वडे कांचन खेत्रे, एडवोकेट प्रतिभाताई रेणुकर यांसह सर्व गट प्रमुख, सर्व गण प्रमुख, सर्व बुथ प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आणि सर्व आघाड्यांचे, सर्व मोर्चांचे पदाधिकार्यांनी उपस्थित होते.
जि. प. व पं. स. च्या आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. गेली अडीच वर्षाच्या काळात कधीही न दिसणारे अनेक जण यावेळी उठून दिसत होते, अडचणीच्या काळात भाजपाचा किल्ला लढवणारे काहींना मात्र बसायला खुर्च्या नव्हत्या. यावर दबक्या आवाजात चर्चा होत होती.