Breaking newsMarathwada

कंटेनर-ट्रकचा भीषण अपघातात, एक जण जागीच ठार

पाचोड (प्रतिनिधी) – पैठण तालुक्यातून जाणार्‍या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील कोळीबोडखा येथील हमीद बानोमिया पटेल हे जागीच ठार झाले आहेत. आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.

मृतक हमीद बानोमिया पटेल

याविषयी अधिक माहीती अशी की, औरंगाबाद कडून बीडकडे जात असताना गेवराई जवळच्या रस्त्यावर जालन्याकडून सोलापूरकडे  लोखंडी सळईची वाहतूक करणारी गाडी बंद पडली होती . या गाडीला भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की वाहनांचा अक्षरशः या चुराडा झाला आहे.  या घटनेची नोंद गेवराई पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.  ठार झालेले हमीद बानाेमिया पटेल हे काेळीबाेडखा येथील रहिवासी आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!