पॉर्न स्टार रिया बेर्डे हिंदू नाही तर बांगलादेशी मुस्लीम; बन्ना शेख हे खरे नाव!
- बनावट कागदपत्रे बनवली, पोर्नस्टार होण्यापूर्वी केला शरीरविक्रय
– मुंबई पोलिसांकडून तिच्यासह कुटुंबीयांना अटक
मुंबई (सिने प्रतिनिधी) – पोर्ट इंडस्ट्रिजमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेली पॉर्न स्टार रिया बेर्डे ही हिंदू नसून, बांगलादेशी मुसलमान असल्याचे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. तिने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने भारतात घुसखोरी केली व बर्डे आडनावाच्या व्यक्तीशी विवाह करून आधार कार्ड व पासपोर्टदेखील बनविला. पोलिसांनी तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे. मुंबईतील ठाणे येथून तिला अटक करण्यात आली आहे.
अमरावती येथील बेर्डे याच्याशी विवाह करण्यापूर्वी ती मुंबईत शरीरविक्रय करत होती. त्यानंतर ती पोर्न इंडस्ट्रीजमध्ये गेली. तिथे शूट झालेले तिचे अनेक व्हिडिओज सद्या धुमाकूळ घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत मिश्रा या तिच्या जवळच्या मित्राला रिया ही मुस्लीम असून, बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती कळल्यानंतर त्याने ही माहिती ठाणे पोलिसांना दिली. त्यानंतर तिला अटक झाल्यानंतर सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यापूर्वी तिला वेश्या व्यवसाय करताना पकडले गेले असून, तिचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता.
——-