बुलडाणा /जिल्हा प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील दत्तात्रय पडघान आणि सर्जेराव पडघान इतर ३० शेतकर्यांच्या शेतात जाण्याचा पांदण शेतरस्ता शेजारी शेत असलेले शेतकरी सोळंकी यांनी अडविला होता. यावर शेतकर्यांच्या तक्रारीवरून तहसीलदार येळे यांनी शेतरस्ता खुला करण्याचे आदेश देताच मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी येवून शेतरस्ता मोकळा केला. मात्र सोळंकी यांनी तहसीलदारांचा आदेशाला केराची टोपली दाखवून पुन्हा शेत रस्ता अडवून टाकला आहे.
मेरा बु. शिवारात असलेल्या गट न २४८ , ३७१ मध्ये वाडी शिवार पांदण शेतरस्त्याचा वापर शेतकरीपूर्वी पासून करीत होते. या पांदण शेत रस्त्याचे काम पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निधीमधून करण्यात आले. मात्र सदर रस्ता दिपक वसंता सोळंकी, सुभाष उध्दव सोळंकी, संतोष उध्दव सोळंकी व संजय उध्दव सोळंकी, वसंतराव माधवराव सोळंकी व लक्ष्मण रामकृष्ण इंगळे यांनी शेतकर्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने अडविलेला आहे. सदर अडविलेला रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी दतात्रय पडघान , सर्जेराव पडघान आदी तीस शेतकर्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. त्यामुळे तहसीलदार यांनी पांदण शेत रस्ता खुला करून द्यावा, असे मामलदार कोर्ट एक्ट १९०६ चे कलम ५ नुसार आदेश दिले होते. या आदेशानुसार मंडळ अधिकारी जाधव तलाठी पर््हाड , यांनी घटनास्थळी येवून पंचासमक्ष पांदण शेत रस्ता खुला करुना दिला. शेत रस्ता खुला केल्याचा अहवाल मंडळ अधिकारी यांनी वरिष्ठांकडे सादर केला.
त्यानंतर काही दिवस जाताच पुन्हा केशव नारायण सोळंकी, दीपक वसंता सोळंकी ,संतोष उध्वव सोळंकी यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत रस्त्यावर दगड टाकून रस्ता अडविला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना शेताची पेरणी करण्यासाठी खत बी बियाणे शेतातील गोठयात साठविणे आहे मात्र रस्ता अडविल्याने शेताची पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी तहसीलदार यांनी पेरणी पूर्वी अडविलेला पांदण शेतरस्ता खुला करुना न दिल्यास येत्या आठ दिवसाच्या आत आम्ही शेतकरी दतात्रय दगडुजी पडघान पडघान, मदन राधाकृष्ण पडघान, ज्ञानेश्वर बालाजी पडघान, बद्रीप्रसाद दतात्रय पडघान, सर्जेराव पडघान आदी शेत रस्त्यावर आमरण उपोषणाला बसणार आहोत, यामध्ये शेतकर्यांना काही जीवितहानी झाल्यास संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील, असे तक्रारी मध्ये नमूद केले आहे..
Leave a Reply