CrimeHead linesPune

पोटच्या मुलीनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने सख्ख्या आईला हालहाल करून ठार मारले!

– पुण्याजवळील वडगाव शेरीतील धक्कादायक घटना

पुणे (वैष्णवी मांडेकर) – पैशांसाठी बॉयफ्रेंडला घरी बोलावून घेत आईचा डोक्यात हातोड्याने घाव घालून व उशीने नाक दाबून धरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना पुण्याजवळील वडगाव शेरीमध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मित्राच्या मदतीने खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनाव रचण्यात आला. परंतु, नातेवाईकांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांच्या तपासात खुनाचा हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईसाठी काळ बनलेल्या या मुलीने हातोड्याने वार केल्यानंतर उशीने आईचे तोंड दाबून धरले, त्यामुळे हातपाय खोरून व जीव गुदमरून आईचा भयानक मृत्यू झाला. नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून जन्माला घातल्यानंतर, आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्यानंतरही पोटची मुलगी इतकी निर्दयी होऊ शकते, हे पाहून समाजमन हादरून गेले आहे.

मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, योशिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे. तिने मित्राच्या मदतीने मंगल यांच्या बँक खात्यामधून परस्पर पैसे काढले होते. आईला हा प्रकार समजला तर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती. तिने आईचा थेट खून करण्याचाच कट आखला. तिने मित्राला घरी बोलावून घेतले. त्याला घरातील हातोडा दिला. मंगल या घरात झोपलेल्या असतानाच आरोपी यश याने त्यांच्या डोक्यात हातोड्याने घाव घालायला सुरुवात केली. त्यावेळी योशिताने आईचे तोंड स्कार्फ व उशीने दाबलेले होते. त्यानंतर, आई पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव रचण्यात आला. दरम्यान, या मृत्यूबाबत नातेवाईकांना शंका आली. त्यांनी पोलिसांकडे याबाबत शंका उपस्थित केली.
परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास करून हा खुनच असल्याचे समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.


पोलिसांनी या निर्दयी मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच योशिता हिने मित्राच्या मदतीने आपण आईचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. आई घरात झोपली असताना योशिताने आईचे तोंड उशीने दाबले. त्याचवेळी तिचा मित्र यशने डोक्यात हातोड्याने वार केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि गंभीर जखमी झाल्याचं योशिताने नातेवाईकांना सांगितले. मात्र मुलीच्या बोलण्यावरून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. योशिताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच तिने खूनाचे कारण सांगितले. योशिताने मित्राच्या मदतीने आईच्या खात्यातून न सांगता काही पैसे काढले होते. आईला हा प्रकार समजल्यास ती रागवेल या भीतीने योशिताने मित्रासोबत मिळून आईचा खून केला. मित्रासोबत खूनाचा कट रचून १८ वर्षांच्या मुलीने आईची हत्या केल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!