AalandiPachhim Maharashtra

एकादशीदिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पापमोचनी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते.

आळंदी मंदिरात भाविकांनी एकादशी दिनी गर्दी करीत रंग लावून हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने,सेवक, कर्मचारी, मानकरी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांनी नियोजन करीत भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन सुलभ देण्यासाठी नियोजन केले. आपापली काळजी घेऊन भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने देहूकर यांचे वतीने कीर्तन सेवा, रात्री आरती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.
आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. नरके यांनी मार्गदर्शन केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून मुक्तता झाली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!