देहूनगरीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा लाखो भाविकांच्या नामजयघोषात साजरा
आळंदी / देहू (अर्जुन मेदनकर ) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा त्रिशत्कोत्तरअमृत महोत्सव बीज सोहळा बुधवारी ( दि. २७ ) हरिनाम गजरात देहुत पार पडला. सोहळ्यास राज्यभरातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ || असं म्हणत जगाला समता शांतीचा आणि विवेकाचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याच आख्यायिकेस अनुसरून तुकाराम बीज सोहळा परंपरेने साजरा करण्यात आला. सोहळ्यात पहाटे ३ वाजता काकाडा आरती, पहाटे ४ वाजता तुकाराम महाराजांच्या पादुकांना महापुजा अध्यक्ष व विक्ष्वस्त यांचे हस्ते श्री संत तुकाराम महाराज महापुजा झाली. पवमान अभिषेक झाल्यानंतर, सकाळी १० ते १२ दरम्यान ह. भ. प. बापू महाराज देहुकर यांची किर्तन सेवा झाली. त्यानंतर तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान झाले. वैकुंठ मंदिरात आरती, प्रदक्षिणा घालून नांदुरकीच्या वृक्षाजवळ जमलेले लाखो वारकरी भाविकांनी एकाच वेळी पुष्पवृष्टिने सोहळा पार पडला.
सोहळ्यासाठी आलेले वारकरी दिवसभर पालखी दर्शन, तुकारामांच्या पादुकांचे दर्शन त्याचबरोबर किर्तन भजनाचा आनंद घेत महाप्रसाद झाला. बीज सोहळा हा वारकऱ्यांचा अत्यंत मानाचा मानला जातो. वारकरी पंथाचे कळस तुकोबा आहेत एका अभंगात तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी म्हटलंय. हे पाहता तुकोबांच्या बीजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बापु महाराज देहुकर किर्तन सांगता होते त्याच बरोबर देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील पाहण्यास मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती लाखो भक्तगण घेतात. संत तुकाराम महाराज बीज साठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. या महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे बीज सोहळ्यास उपस्थित होते. निगडी तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रविण ढमाले, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, खासदार श्रीरंग बारणे, शाहुनगर नगरसेवक नारायण बहिरवडे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रविण काळोखे, योगेश परंडवाल, मयुर शिवशरण, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, देहू नगरपंचायतीचे नागसेवक पदाधिकारी, परिसरातील ग्रामपंचायतचे आजी, माजी सरपंच, देहूकर नागरिक भाविक उपस्थित होते. राज्यातील विविध भागातील दिंड्या दिंड्यातून आलेल्या भाविकांनी देहूत हरीण गजर करीत देहू नगरी भाविकांचे नाम जय घोषणे दुमदुमली. देहू मंदिर, गाथा मंदिर, इंद्रायणी नदी घाट आणि गाथा मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर भाविकांचे गर्दीने फुलला होता. मिळेल त्या ठिकाणाहून भाविकांनी बीज सोहळा अनुभवला. यात इंद्रायणी चे दुतर्फ़ा घाटावर, परिसरातील उंच इमारतीवर झाडांवर बसून अनेक भाविकांनी बीज सोहळा पाहत यात सोहळ्यात सहभागी झाली. भाविकांच्या स्वागतासह सुरक्षिततेस मोठी दक्षता घेत वाहन प्रवेशावर मर्यादा आणून देहूतील रस्ते भाविकांचे रहदारीस खुले ठेवण्यात पोलीस आणि देहू नगरपंचायत प्रशासनास यश आले.
बीज सोहळ्याचे प्रशासकीय नियोजन प्रांत हवेली संजय असवले, तहसीलदार जयराम देशमुख, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, देहू देवस्थानचे वतीने संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी प्रभावी नियोजन करून भाविकांना सेवा सुविधा दिल्या. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांचे सुलभ दर्शन होईल अशी व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. देहूला जत्रेचे स्वरूप आले होते. भाविकांनी दुतर्फ़ा असलेल्या दुकानातून प्रसाद खरेदीस गर्दी केली. देहू नगरपंचायतीने यावर्षीही भाविकांचे स्वागताची तसेच भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यास कंबर कसली. स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा, जंतुनाशके फवारणी, पी. ए.सी. यंत्रणा विकसित केल्याने भाविकांना सूचना देण्यास उपयुक्त ठरल्याचे कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले. तुकाराम बीज महोत्सवात देहू येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पोलिस मित्र वेल्फेअर असोशिएशन ऑफ इंडियाच्या तर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात पोलीस मित्रानी सेवा रुजू केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी साहेब, सहाय्यक पोलिस आयुक्त कसबे साहेब, पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे, पोलिस उपनिरीक्षक जमदाडे साहेब, पोलीस मित्र वेल्फेअरचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र जाधव, कमांडर किरण कोल्हे, सचिन घोंगडे, संदिप चोपडे, निलेश कापडणे, करण कव्हळे, सुरज शिंदे, कैवल्य टोंपे इतर पोलिस अधिकारी व कमांडर यांनी परिश्रम घेतले.