MEHAKAR

चिमुकल्यांनी गिरविले आर्थिक व्यवहाराचे धडे!

मेहकर (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना शालेय व व्यावहारीक ज्ञान प्राप्त होवून त्यांचे व्यक्तिमत्व उन्नत होत आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा हिवरा आश्रम येथे शनिवार ता.२० रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी २० ते २५ खाद्य पदार्थ बनवून त्यांची स्वतः विक्री करून आर्थिक व्यवहाराचे धडे गिरविले.

जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा हिवरा आश्रमच्या या चिमुकल्यांची सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना विक्री कौशल्यासोबतच आर्थिक व्यवहार कसा करावा याचे ज्ञान प्राप्त झाले. या आनंद मेळाव्यात १३० विद्यार्थी विद्यार्थीनींचा उस्फुर्तपणे सहभाग घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी ८ ते १० वेळात शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्य पदार्थाची स्टॉल लावले होते. या आनंद मेळाव्यात खाद्य पदार्थाचे प्रदर्शन व विक्री साठी मांडण्यात आले होते. यामध्ये कचोरी, समोसा, वडापाव, भजे, गुलाब जामुन, जिलेबी, पाणी पुरी, भेळ, इडली, डोसा, ढोकळा, वडे, पॉपकॉर्न, पोंगे, विविध फळे,व यासारखे अनेक पदार्थ होते.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य, बहुतांश पालक महिलावर्ग यांनी सहभाग झाले होते. यावेळी पालकांनी सहभाग घेऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला. बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहित केले. यावेळी केंद्र प्रमुख शिवाजीराव लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. पी. शेळके, शिक्षक पी. बी. दुनगू, एस. यू .पवार, एस. एच. पुरी, कु एम. एस. म्हस्के, कु एस. पी. तुपकर, कु. ए. एस. साखरे ,कु आर. एस. सजगुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!