Breaking newsKhandesh

अक्कलकुवात दरड हटविण्यास प्रारंभ ; दोन दिवसात रस्ता हाेणार खूला

नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा, गमण, जांगठी, सिंदुरी, मणीबेली रस्त्यावर अतिवृष्टीत दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्या दौऱ्यानंतर अक्कलकुवा तालुका तहसीलदार सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्यासह तालुका प्रशासनाने दोन जेसीबी द्वारे दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पिंपळखुटाहून पुढे एका जेसीबी द्वारे काम सुरू केले आहे तर जागती होऊन अलीकडे एका जेसीबी द्वारे दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पिंपळखूटाहून पुढे संपूर्ण अतिदुर्ग डोंगरदर्‍याचा रस्ता असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून पुढील दोन दिवसांत नागरिकांच्या दळणवळणासाठी रस्ता खूला करण्यात येईल अशी माहिती अक्कलकुवा तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली आहे. दरम्यान उद्या (शनिवार) आणखी एक जेसीबीद्वारे कामाला सुरुवात केली जाईल असेही मस्के यांनी नमूद केले

अक्कलकुवा तालुक्यातील दूर्गम भागातील पिंपळखुटा आवलीफाटा, चिखनीपाडा, छापरीउंबर, रोहय्याबारी, कोराई, दराबारी, मोगरीबारी, जांगठी, शेंदुरी, सिपान, मणिबेली या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टीत दरड काेसळून दळणवळणाची सोय बंद झाली आहे. अक्कलकुवा, मोलगी येथे बाजारात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. विशेष म्हणजे दुर्गम भागातील रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ते खरडून वाहून जातात असा आरोप देखील येथील नागरिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!