देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – तालुक्यातील आळंद येथे दि.१९ डिसेंबर दुपारी एक वाजता घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातून रोख ९० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. आळंद येथील खाडे कुटुंब कापूस वेचण्यासाठी शेतात गेले असता चोरट्याने दिवसा घरफोडी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की आळंद येथील संतोष सखाराम खाडे यांचे कुटुंब शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान, घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचा पोहेहार किमत १ लाख ९० लोखंडी कपाटचे हॅण्डल लॉक तोडून हजार, सोन्याची गळ्यातील साखळी पोत, कानातील सोन्याचे झुंबर, सोन्याची बेल, सोन्याच्या तीन अंगठ्या, साखळी चैन, सेवन पीस, पायातील चांदीचे गडूळे व रोख 90 हजार रुपये असा एकूण ५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. संतोष सखाराम खाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव बाघ, पीएसआय नरवाडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले करीत आहेत.