BULDHANACrimeVidharbha

अवघ्या २३ वर्षाच्या तरूणाने गोठ्यात गळफास घेऊन केली आत्महत्या

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथील २३ वर्षीय तरुणाने गोठ्यातील लोखंडी अँगलला दोर लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (दि.८) रात्री घडली आहे. अशोक कलाजी लिपने असे या मृत तरूणाचे नाव आहे. अशोकच्या जाण्याने सर्व व्यवसायिकांनी स्वंयस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवून हळहळ व्यक्त केली. त्याच्या पश्चात वडील, आई, मोठा भाऊ, वहिनी, दोन बहिणी, पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

याबाबत मृत अशोकचे चुलतभाऊ संजय भानुदास लिपने यांनी फिर्यादीत नमूद केले, की माझे काका व अशोकचे वडील कलाजी संपत लिपने यांचा सोनोशी रस्त्यावर स्वतःचा गोठा आहे. ते रात्री जेवण आटोपून साधारण नऊ-साडेनऊ वाजेदरम्यान बैलांना चारावैरण करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा अशोक कलाजी लिपने हा टिनपत्राचे शेड असलेल्या गोठ्यात लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी प्रचंड आक्रोश करत हंबरडा फोडला. रडण्याच्या किंकाळ्या ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने सर्व रा. वर्दडी बुद्रूक या सर्वांनी जाऊन पाहिले असता, सदर व्यक्तीने नायलॉन दोरीने गळफास घेतलेला प्रकार लक्षात आला.
फिर्यादी व सोबत असलेल्या सहकार्‍यांनी दोर सोडून घेतला व त्यास तात्काळ रूग्णवाहिकेत टाकून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले व सदर प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. याबाबत पोलिस ठाणे किनगावराजा येथे फिर्यादी संजय भानुदास लिपने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल अधिकारी सहाय्यक फौजदार शरद ठोंबरे यांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल रमेश गोरे, पोलिस कॉन्स्टेबल सलिम परसुवाले, सुभाष गिते हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!