Head linesSangali

सांगलीच्या बोरगाव टोलनाक्यावर पहाटे भीषण अपघात

– १३ जण जखमी : मिरज व सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

सांगली (संकेतराज बने) – जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. पोलिस घटनेची चौकशी करीत आहेत.

हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर आज पहाटे झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाहन चालकास डुलकी लागल्याने वाहन टोल नाक्याच्या दुभाचकला जाऊन धडकले. त्यानंतर वाहन पलटी झाले. हा अपघात झाल्याचे पाहताच काही नागरिक वाहनाच्या दिशेने धावले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना वाहनाच्या बाहेर काढण्यास प्रारंभ केला. यावेळी वाहनातील काही जणांना मार लागला होता. या अपघातात सुमारे १३ जण जखमी झाले आहेत. हे सर्व निपाणीहुन पंढरपूरला निघाले होते. सर्व जखमींना मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!