Breaking newsMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

अमरावतीकरांचा संताप; भंपक, चिथावणीखोर पुढारीच उमेश कोल्हेचे मारेकरी?

मास्टरमाईंड इरफान खानला अटक

अमरावती (ब्रेकिंग महाराष्ट्र) – अमरावती शहरातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवणारे; चिथावणीखोर भाषणे आणि कृत्ये करून आगीत तेल ओतणारे तथाकथित, स्वार्थी, भंपक पुढारी हेच उमेश कोल्हे यांचे खुनी असल्याचा संताप सर्वसामान्य अमरावतीकर व्यक्त करत आहेत. या नालायकांनी धार्मिक विषयात नाहक सामाजिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा हीन प्रयत्न सातत्याने केला. आता हे हरामखोर राजकारणी या निष्पाप, सर्वसामान्य माणसाच्या जीवाची भरपाई करून देणार आहेत का?, असाही सवाल अमरावतीकर करत आहेत. दरम्यान, नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
एनआयएने याप्रकरणी तपास हाती घेऊन सहा जणांना अटक केली आहेच. तरीही राज्यातील नव्या, ‘महाराष्ट्र हितासाठी सत्तेत आलेल्या’ सरकारने अमरावती शहर पेटविणार्‍या नराधम आणि नीच राजकारण्यांचा शोध घेऊन एनआयएच्या सहकार्याने मुख्य सूत्रधारांना हुडकून तुरुंगात डांबावे आणि सर्वसामान्य अमरावतीकरांची भययुक्त पाशातून मुक्तता करावी, अशी मागणी अमरावतीकर करू लागले आहेत.
तुमचे धार्मिक विद्वेषाचे राजकारण घाला चुलीत, आम्ही इतके वर्षे सलोख्याने आणि सुखाने नांदत आहोत; आम्हाला शांततेने जगू द्या; राजकारण्यांना कुठे जाऊन मरायचे तिकडे त्यांनी जावे, शहरातून तोंड काळे करून बाहेर जाऊन राजकारण करावे, अशी तीव्र भावना अमारावतीकर व्यक्त करीत आहेत. राजकारण्यांच्या घाणेरड्या खेळात राकेश कोल्हे यांचा हकनाक बळी गेला. आता प्यादे अडकवले जातील पण उठसूठ धार्मिक विद्वेष पसरवून अमरावतीकरांना वेठीस धरणारे मात्र मोकाट राहतील, अशी अमरावतीकरांना भीती आहे. शहराचे वातावरण बिघडवणारी मंडळी या शहरात राहिली तर भविष्यात दुसरा कुणी निष्पाप, निरपराध राकेशचा जीव धोक्यात येण्याची भीती राहिलच. त्यामुळे शहरातील घाण, कचरा इतरत्र डंप करून शहर दुर्गंधीमुक्त करावे, अशी मागणी सर्वसामान्य अमरावतीकर करत आहेत.

या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक कऱण्यात आली आहे. ज्यामध्ये मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण हिदायात खान (२५), अब्दुल तौफिक शेख तसलीम (२४), शोएब खान साबीर खान (२२), आतिब रशीद आदिल रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आता यामध्ये मास्टरमाईंड इरफान खान याचा समावेश झाला आहे.

इरफान खानची अटक अमरावती पोलिसांची मोठी कारवाई

देशात खळबळ उडवणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान खान असे त्याचे नाव तो एक एनजीओ चालवतो. या प्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक केली आहे. इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची मोठी कारवाई समजली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!