LONARMEHAKARVidharbha

बीबी येथे राजमाता जिजाऊ मॉसाहेब जयंती उत्साहात साजरी

बिबी (प्रतिनिधी) – सालाबादाप्रमाणे याहीवर्षी काल १२ जानेवारीरोजी शिवशंभु प्रतिष्ठाण व गावकरी यांच्यावतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेबांची जयंती बीबी येथील नायरा पेट्रोलपंप येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्राची अस्मिता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांना विनम्र अभिवादन करून जिजामातेची पूजाअर्चा करण्यात आली. नेहमीप्रमाणे यावर्षीही शिवशंभु प्रतिष्ठान व गावकरी मंडळी यांच्यावतीने अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भव्यदिव्य असे स्टेज लावून व जिजामातेंची प्रतिमा लावून या ठिकाणी पूजन करण्यात आले. जय जिजाऊ जय शिवरायच्या जयघोषाने सर्व परिसर हा दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे लहान मुली ह्या जिजाऊ मॉसाहेबांच्या वेशभूषा करून आल्या होत्या, तर लहान मुले हे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आले होते. ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी झाली होती.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!