Aalandi

मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचा सत्कार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कैलास केंद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पोलिस मित्र युवा महासंघच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ज्योती पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी सर्व टीमने स्वागत केले.

या प्रसंगी पोलिस मित्र युवा महासंघचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतील पच्छिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा , चाकण, खेड, महिला आघाडी, वाहतुक आघाडी, शिक्षक आघाडी, युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण बोबडे यांनी मनोगत व्यक्त करीत आळंदी नगरपरिषदेत स्वागत करीत पालिकेच्या उपक्रमात सर्वांचे सहकार्य राहील अशी ग्वाही आली.

भागवत काटकर यांनी मागील कार्याचा आढावा देत यापुढेही आळंदी नगरपरिषद प्रशासनाचे कार्यात सक्रिय सहभाग सर्व सेवाभावी संस्थानचा राहील असे सांगितले. मुख्याधिकारी कार्यालयात विविध सेवाभावी व्यक्ती, संस्था, पक्ष संघटना यांनी भेटून मुख्याधिकारी केंद्रे यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेतर्फे ( ठाकरे गट ) उत्तम गोगावले, आशिष गोगावले, संगीता फफाळ, मंगला हुंडारे, राहुल चव्हाण, सुलतान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!