लोणावळा (प्रतिनिधी) – पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ सिमेंटचे पोते भरलेल्या मालवाहू ट्रकचा थरार पहायला मिळाला. पुण्यावरून मुंबईला जाणार्या ट्रकचा ब्रेक फेल होताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला हॅन्ड ब्रेक लावून उभा केला. मात्र अचानक हा सिमेंटच्या पोत्याने भरलेला ट्रक हॅन्ड ब्रेक निकामी होऊन द्रुतगती मार्गावर धावला. या ट्रकचा थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. हॅन्ड ब्रेक फेल होताच हा ट्रक महामार्गावर धावू लागला. चालकाने ट्रकमधून उडी मारली व या ट्रकमागे असलेल्या गाड्या थांबवल्या. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा मोठा अपघात घडला असता. हा ट्रक सिमेंटच्या पोत्याने भरलेला होता.
ब्रेक फेल अन सिमेंट भरलेला ट्रक एक्स्प्रेस वेवर सुस्साट!
You Might Also Like
- Advertisement -
Latest News
- Advertisement -