-वाजत-गाजत काढण्यात आली राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची भव्य मिरवणूक
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान, निबंध आणि वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
३१ मे रोजी दुपारी ४ वाजता वार्ड क्रमांक ६ मधून राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती राजू ठोके, सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी सरपंच सुनील जगताप, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, संग्रामसिंह राजपूत, संतोषराव मोरे, कनिष्ठ अभियंता रोहित पाटील, रमेश ठोसरे, शिवशंकर मखमले, आयुब कुरेशी, संदीप मगर, दिलीप बेंडमाळी, संतोष मंडळकर, देवानंद खंडागळे, प्रवीण पाझडे आणि गोपाल पाझडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
निबंध स्पर्धेत सोहम टाले यांनी प्रथम, समर्थ दानवे यांनी द्वितीय तर यश गाडगे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रेरणा भालेराव प्रथम, चैतन्य खराडे द्वितीय आणि सृष्टी पाटील तृतीय ठरल्या. जनरल गटात निकिता खंडारे व समर्थ गाडेकर यांनी प्रथम, योगेंद्र वाकोडे व भारती यादव यांनी द्वितीय, तर निकिता गवई व ऋषिकेश अजगर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. वेशभूषा स्पर्धेत अर्पिता फुके, वृक्षसंवर्धन उपक्रमात सोहम टाले आणि सामाजिक कार्य क्षेत्रात दगडूबा चवरे यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन होळकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.