– संरक्षण भिंत व डागडुगी करून भक्तांसाठी मंदिर लवकरच दर्शनासाठी खुलं होणार
लोणार (वाजिद खान) – नगराध्यक्षा सौ. मीराताई भूषण मापारी यांच्या पुढाकाराने लोणार सरोवरातील माँ कमळजा देवी मंदिराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार, असे आश्वासन पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मलिक यांनी २८ जानेवारी रोजी दिले.
यासाठी लिफ्टद्वारे सर्व साहित्य खाली नेऊन मंदिराची डागडुगी केली जाणार आहे. मंदिरात पाणी जाणार नाही यासाठी मंदिरासमोर संरक्षण भिंत बांधली जाईल. तसेच वन्यजीव विभागाच्या वतीने रामगयाचे पाणी वर लिफ्ट करून मंदिरात पाणी पोहोचवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. धारेच्या पाण्याची परवानगी मिळाल्यानंतर पाण्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल.
सरोवरातील वाढत चाललेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून, माँ कमळजा माता भक्तांसाठी येत्या सहा महिन्यांच्या आत मंदिर संरक्षण भिंतीसह डागडुगी करून दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. यामुळे माँ कमळजा देवी सेवा संघ आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. मिराताई मापारी, तहसीलदार भूषण पाटील, आणि माँ कमळजा सेवा संघाचे सर्व सदस्य व सरोवर प्रेमी नागरिक उपस्थित होते.