बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) शहरालगत जंगलभाग येत असल्याने अस्वल व बिबट्याचा वावर वस्तीमध्ये आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांत अस्वल व बिबट्याचे दर्शन शहरवासीयांना झाले आहे. बुलडाणा शहर अजिंठा पर्वत रांगेवर वसल्याने आता निवासी क्षेत्र डोंगराच्या काठापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. पूर्वीकडे ज्ञानगंगा अभयारण्य तर पश्चिमेकडे अजिंठा डोंगररांग आहे. या जंगलात अन्न साखळी पद्धतीचे पोषक वातावरण असल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वलासह बिबट्यांचा अधिवास आहे. मागील आठवड्यात एक अस्वलाने शहरातील चांडक लेआऊटमध्ये दाखल होऊन मॉर्निंग वॉक केले होते. तर दोन दिवसा अगोदर एक अस्वल चक्क डीएफओ अक्षय गजभिये यांच्या रानी बागेतील बंगल्यापर्यंत पोहोचला होता.आरटीओ ऑफिसच्या मागे खालीदबिन वलीद नगर या नवीन वस्तीच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागातून बिबटे या परिसरात नेहमी येत असतात व त्या भागातील अनेक कुत्र्यांना उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यापासून सतत एक बिबट म्हाडाची नवीन वस्ती, खालीद बिन वलीद नगरच्या परिसरात फेरफटका मारत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.
बुलडाण्यात अस्वलासह बिबट्याची दहशत
You Might Also Like
- Advertisement -
Latest News
- Advertisement -