आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्पोर्ट्स कार्निवल, आंतर महाविद्यालयीन बास्केटबोल स्पर्धेचे १४ व १५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
आळंदी महाविद्यालयतील क्रीडा विभागाचे वतीने स्पोर्ट्स कार्निवल व आंतर महाविद्यालयीन बास्केटबोल स्पर्धा १४ व १५ ऑक्टोबर २०२२ ला होत आहेत. या वेळी महाविद्यालयाचे शाररीक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. राजेश कडलक, उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर यांनी स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धा ही आंतर महाविद्यालयीन असून या मध्ये मुले आणि मुली याचे संघ सहभागी होणार आहेत. आता पर्यंत पुणे जिल्ह्यातील १४ महाविद्यालयातील संघांनी स्पर्धेसाठी नाव नोदणी केली आहे. प्रथम विजयी संघाला ४० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्वरुपाची खूप पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धे विषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे म्हणाले, बास्केट बॉल स्पर्धेचा मुख्य उदेश भारतातील क्रीडा संस्कृतीला तळागाळात पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने २०१८ मध्ये खेलो इंडिया योजना सुरू केली. भारतात खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांसाठी एक ठोस फ्रेमवर्क तयार करून आणि आपला देश एक क्रीडा राष्ट्र म्हणून प्रस्थापित करून क्रीडा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट आहे. या धर्तीवर स्पोर्ट्स कार्निवल व आंतर महाविद्यालयीन बास्केटबोल स्पर्धेचे १४ व १५ ऑक्टोबर २०२२ रोजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.