– केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – गरीब कल्याण अन्न योजना अर्थात मोफत रेशन योजनेला केंद्र सरकारने आणखी तीन महिने मुदतवाढ झाली आहे. सप्टेंबरच्या ३० तारखेला या योजनेची मुदत संपणार होती. त्यामुळे मोफत धान्य मिळणे बंद होणार का, याची चिंता गोरगरीबांना लागून राहिली होती. परंतु, मोदी सरकारने या योजनेला मुदतवाढ देत गरिबांना दिलासा दिला आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मोदी सरकारने मार्चमध्ये सुरू केली होती. कोरोना या साथीच्या आजारामुळे लॉकडाऊनदरम्यान ८० कोटी लोकांना मोफत अन्न देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. सरकारने या योजनेला अनेक वेळा मुदतवाढ दिली. यापूर्वी ही योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत होती, त्यानंतर ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तिला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, ८० कोटींहून अधिक लोकांना ५ किलो तांदूळ किंवा गहू, १ किलो हरभरा मोफत दिला जातो. हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अनुदानित शिधाव्यतिरिक्त आहे. सरकारने मार्चपर्यंत या योजनेवर सुमारे २.६० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत आणि सप्टेंबरपर्यंत ८० हजार कोटी रुपये आणखी खर्च झाले आहेत. एकूण खर्च सुमारे ३.४० लाख कोटी रुपये झालेला आहे.
#Cabinet approves extension of Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana (PMGKAY) for another three months (October 2022-December 2022)#CabinetDecisions pic.twitter.com/Hnwu1AtT6B
— PIB India (@PIB_India) September 28, 2022