मोताळा- शहरात व शहराजवळील परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. एका चोरीचा शोध लावण्यास पोलिस यशस्वी ठरतात तर तोपर्यंत चोरटे दुसरी चोरी करुन, अस्तीत्व कायमच असल्याची प्रचिती देत आहे. असाच प्रकार मोताळा तालुक्यात 13 जून रात्री घडला आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा तहसिल पुरवठा विभागाकडे वळवित तेथील 10300 रुपयांचे लॅपटॉपच लंपास केल्याने चोरट्यांची माहिती तंत्रज्ञानाशी नाळ तर जुळली नाही ना, अशी चर्चा शहरात सुरु आहे.
मोताळा शहरात मिना ऑप्टीकलमध्ये चोरटयाने चोरी करुन 20 हजार रुपये पळविले होते, त्याची पोलिसांनी शोध घेत चोरट्याला गजाआड केले. लगेच आडविहीर येथील एका शेतकऱ्यांचे भरदिवसा विदर्भ ग्रामीण बँकेजवळ 80 हजार रुपये पळविले. त्यानंतर सदाणी कृषी केंद्रातून 3 लक्ष 80 हजाराचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 6 जूनच्या सकाळी उघडकीस आली. तसेच 7 जुनच्या रात्री खरबडी शिवारात एका शेतकऱ्याच्या गोडावून मधून 67 हजाराचा माल चोरट्ंनी लंपास केला हेाता. सदाणी कृषी केंद्रातील चोरी प्रकरणी मलकापूर येथील सायकलपुऱ्यातील एका अट्टल घरफोड्याला पोलिसांनी 12 जूनच्या रात्री अटक केली, त्याला 13 जून रोजी न्यायालयाने 16 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. तर 13 जूनच्या रात्री पुन्हा चोरट्यांनी अस्तित्व कायम असल्याचा दाखल देत त्याच रात्री मोताळा नांदूरा रोडवरील पंचायत समितीच्या पाठीमागील भागातील शासकीय धान्य गोदामाच्या कामासाठी विपुल हिंगे यांच्या भाड्याने घेतलेल्या खोलीचे कुलूप तोडून तहसिलच्या शासकीय गोदामातील Accer कंपनीचे १० हजार किेमतीचे जुने लॅपटॉप, किबोर्ड 200रुपये व 100 रुपये असा एकूण 10300 रुपयांचा माल लंपास केल्याची फिर्यादी अशोक हिवाळे शासकीय गोदाम मालक तहसिल कार्यालय मोताळा यांनी १४ जून रोजी बोराखेडी पोस्टे.ला दिली. बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 380, 461 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास एएसआय यशवंत तायडे हे करीत आहे.
मोताळ्यात चोरांची जुळली माहिती तंत्रज्ञानाशी नाळ..