-सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल; विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आळंदी (अर्जुन मेदनकर) : अखिल भारत हिंदू महासभेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अखिल भारत हिंदू महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ यांनी दिली.
या नियुक्तीप्रसंगी संस्थेचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री श्री १००८ जगद्गुरू स्वामी माधवानंद सरस्वतीजी महाराज, कार्यकारी अध्यक्ष योगेंद्र वर्मा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज शिवाजी रौंदळ, राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य, राष्ट्रीय कोषाध्यक्ष साक्षी वर्मा, महामंत्री आचार्य अजय कृष्ण शास्त्री, राष्ट्रीय धर्मप्रचारक योगी दादानाथजी गुरु सुखनाथजी, योगी महंत शिवनाथजी महाराज, बालयोगी ऋषिकेशनाथजी महाराज, प्रकाशनाथजी महाराज, योगी शीतलनाथजी, योगी सुंदरनाथजी, महंत सच्चिदानंद सरस्वतीजी महाराज, महंत योगानंद सरस्वतीजी, महंत किशोरानंद सरस्वतीजी महाराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. त्यागी, महाराष्ट्र राज्य प्रभारी राणीताई पवार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भावेश पाटील, राज्य महिला अध्यक्षा आरती राजपूत, कर्नाटक प्रदेश प्रभारी अशोककुमार नानू राठोड, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश तांबट, महाराष्ट्र राज्य मीडिया विभाग उपाध्यक्ष विष्णूभाऊ बिचकुले, लक्ष्मीकांतभाऊ शिंदे, पालघर जिल्हाध्यक्ष प्रिया शंकरराव, पुणे जिल्हाध्यक्ष सागर निंबाळकर, महाराष्ट्र राज्य सदस्य दिनेश माळी, नाशिक शहराध्यक्ष अंकित वाघ, नाशिक जिल्हा उपाध्यक्षा पूनम गांगुर्डे, उपाध्यक्ष पुनीत गोयल तसेच उत्तर प्रदेश विधी विभागाचे अध्यक्ष रवी ब्रिजभूषण यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नियुक्तीपत्र प्रदान करून उपस्थित मान्यवरांनी अर्जुन मेदनकर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीचे पुणे जिल्हाभरातून स्वागत होत असून विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही अर्जुन मेदनकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.