–वृद्धापकाळाने राहत्या घरी अखेरचा श्वास; आळंदी परिसरात हळहळ
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील ज्येष्ठ महिला व आदर्श माता अंजनाबाई किसनराव दिवाणे (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली, एक मुलगा, सून, नातसून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच एन. के. टी. ट्रस्टचे आळंदी विभाग प्रमुख व विशेष कार्यकारी अधिकारी मनोहर दिवाणे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्ययात्रेस आळंदी व परिसरातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, नागरिक तसेच सगे-सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.