नंदूरबार (आफताब खान) – राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यातून लाल मिरची सोबतच हिरवी मिरची ही देशातल्या विविध भागात पाठवली जात असते. यावर्षी पावसामुळे बाजारात येणाऱ्या हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याने नंदुरबार मधील हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मुंबई, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये मांगणी वाढल्याने व्यापारी मिरची खरेदीसाठी जिल्ह्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मिरचीच्या पतवारी नुसार ३० ते ४० रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे मिळणार्या भावाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, असाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत शंकेश्वर जातीच्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आता मात्र, यामध्ये बदल होत आहे. या मिरचीचे उत्पादन घटत असून आता जिल्ह्यात तेजा, व्हीएनआर, अरुणीम, कळस, लाली या वाणांच्या मिरचीची लागवड केली जात आहे. मिरचीचे मोठे उत्दान होत असल्यानं नंदूरबारच्या बाजारात परिसरातील महिला मजूरांच्या हाताला कामही मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणि शेजारील सीमा वरती भागातील गुजरात आणि मध्य प्रदेशातील परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. या भागातील मिरची चवीला अधिक तिखट आणि चवदार असल्याने ह्या मिरचीला मोठ्या प्रमाणात देशभरात मागणी असते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळं इतर भागात मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यामुळं गुजरातमधील मोठ्या शहरातील बाजारपेठेत मिरचीची आवक कमी झाल्यानं आणि दुसरीकडे मुंबईतही मागणी वाढल्यानं मिरचीचे दर यावर्षी आतापर्यंत स्थिर आहेत हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असून चाळीस रुपये प्रति किलोनं व्यापारी जागेवर मिरचीची खरेदी करत आहेत.
सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. याचा परिणाम मिरचीच्या उत्पादनावर झाला आहे. तसेच बाजारात होणारी आवक देखील मंदावली आहे. त्यामुळं मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मागणी वाढल्यानं व्यापारी मिरची खरेदीसाठी जिल्ह्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मिरचीच्या प्रतवारीनुसार 30 ते 40 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. या मिळणाऱ्या दराबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. असाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.