-संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची सर्वानुमते निवड, विविध पदांवर जबाबदाऱ्या निश्चित
बोधेगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना, अहिल्यानगर जिल्ह्याच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते करण्यात आली. या सभेत चंद्रकांत खाडे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती अहिल्यानगर) यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी दादासाहेब शेळके (विस्तार अधिकारी, पंचायत समिती शेवगाव), उत्तर विभाग उपाध्यक्षपदी प्रशांत तोरवणे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती कोपरगाव) तर दक्षिण विभाग उपाध्यक्षपदी संजय जगताप (विस्तार अधिकारी, पंचायत समिती पारनेर) यांची निवड करण्यात आली.
तसेच महिला आघाडी प्रमुखपदी श्रीमती सुवर्णा लेंडे (पंचायत समिती नेवासा), जिल्हा संघटकपदी परमेश्वर सुद्रिक (पंचायत समिती कर्जत), प्रसिद्धी प्रमुखपदी राजा अटकोरे (पंचायत समिती अकोले) तर सचिवपदी संजय गिऱ्हे (पंचायत समिती पाथर्डी) यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन कार्यकारिणीचा अभिनंदन व सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य संघटनेच्या वतीनेही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खाडे यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या आदेशानुसार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) दादाभाऊ गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य प्रभावीपणे राबविण्याचा मानस व्यक्त केला.