– चिखली नगरपालिका निवडणूक; बसपाच्या उमेदवाराचा फटका कुणाला?
चिखली (राजेश लोखंडे) – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल दि. १८ नोव्हेंबररोजी प्राप्त झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या अर्जांतून छाननी प्रक्रियेनंतर एकूण २१ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने उमेदवार दिल्याने हा उमेदवार काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवारावर कितपत परिणाम करेल, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. अर्ज छाननीत देशमुख पंडितराव रामराव (भारतीय जनता पार्टी), कदम किशोर संपतराव (बहुजन समाज पार्टी), गावंडे नीलेश नारायण (नॅशनलिष्ट काँग्रेस पार्टी), बोंद्रे काशिनाथ विश्वंभरआप्पा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे चौरंगी लढतीचे संकेत प्राप्त झाले आहेत.
प्राप्त उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती एकूण पात्र ठरलेल्या अर्जामध्ये १) धंदर विद्या सुनील (अपक्ष), २) घोलप विलास पांडुरंग (शिवसेना), ३) काकडे संदीप खंडेराव (अपक्ष), ४) शेख आफरीन अंजुम जावेद (अपक्ष), ५) भिसे बाळू माणिक (वंचित बहुजन आघाडी), ६) शेख मुनव्वर इब्राहिम (अपक्ष), ७) मोहम्मद शोहेब मोहम्मद राझीक (अपक्ष), ८) सैय्यद नासीर इब्राहिम (अपक्ष), ९) गवई विजयकांत सांडू (रिपब्लिकन सेना), १०) बोर्डे अर्जुन हरिभाऊ (अपक्ष), ११) शेख सईद मुश्ताक (समाजवादी पार्टी), १२) मोहम्मद आरिफ हाशम (अपक्ष), १३) डोंगरदिवे प्रशांत अविनाश (अपक्ष), १४) खान सादिक अजीज (अपक्ष), १५) सय्यद नासिर रोशन (अपक्ष), १६) बोंद्रे प्रशांत विलासअप्पा (अपक्ष), १७) देशमुख पंडितराव रामराव (भारतीय जनता पार्टी), १८) कदम किशोर संपतराव (बहुजन समाज पार्टी), १९) गावंडे नीलेश नारायण (नॅशनलिष्ट काँग्रेस पार्टी), २०) बोंद्रे काशिनाथ विश्वंभरआप्पा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), २१) सैय्यद मतीन सैय्यद हारूण (अपक्ष) आज दि.१९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा कालावधी आहे. तसेच अपील असल्यास ही मुदत दि.२१ ते दि.२५ नोव्हेंबर ही राहणार आहे, आणि अंतिम उमेदवारी यादी व चिन्हवाटप २६ नोव्हेंबररोजी होणार आहे. अंतिमरित्या निवडणूक रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहतात ते दि.२६ नोव्हेंबररोजी कळणार आहे.