पाचोड(विजय चिडे) – पाचोड ता.पैठण येथील शिवछत्रपती महाविद्यालयात दि.१७ बुधवारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य चंद्रसेन कोठावळे हे होते.
याविषयी पुढे बोलतांना सपोनि सुरवसे यांनी असे म्हटले की, सध्याच्या धावपळी काळात प्रत्येक व्यक्ती जिवनात व्यस्त आहे. मात्र युवकांनी कोणत्याच वेळाची सोडू नये,थोडासा मोबाईल दुर करून पुस्तके वाचा जे करुन तुमच्या ज्ञानात भर होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक ध्येय डोळ्या समोर निश्चित करा आणि त्या धैय्याच्या दिशेने जाण्यासाठी वाटचाल करत रहा यशासाठी आतोणात प्रयत्न करा संकटे भरपुर येतील भिती हि दाखवली जाईल यशा पासुन दुर नेहण्यासाठी हे क्षेत्र सोडून द्यावे असे वाटेल, पण असे करु नका तुमचे एक यश सर्व अपयशांना पुरुण उरेल या साठी जे जे या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करते आहेत. त्यांनी धिर सोडू नये प्रयत्न महत्वाचा आहे. कोणती हि आडचण आसुद्या त्यावर मार्ग निघत आसतो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी डाँ.प्रा.विलास महाजन यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर डॉ.प्रा.संतोष चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. सचिन कदम, डॉ. भगवान जायभाये, प्रा. संदीप सातोनकर, डॉ. उत्तम जाधव, डॉ.गांधी बाणायत ,प्रा. हेमंत कुमार जैन, प्रा.विनोद कांबळे,
उमाकांत भोसले, वैभव राऊत, प्रतीक देशमुख यासह विद्यार्थी उपस्थित होते.