– जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
– मूलभूत अधिकार मागणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा तर; सरन्यायाधीशांवर हल्ला करणारे मोकाट : राहुल बोंद्रे
बुलढाणा (राजेश लोखंडे) – भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या धर्मनिरपेक्षेतेवर हा हल्ला आहे. हा हल्ला भारतीय राज्यघटनेवरचा हल्ला असून, महाविकास आघाडीच्यावतीने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. एकीकडे मूलभूत अधिकार मागणार्या सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्या जातो तर दुसरीकडे ज्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला चढवला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात नाही? त्यांच्यावर कारवाई न होता ते मोकाट फिरत आहेत. ही न्यायव्यवस्थेची खिल्ली तर लोकशाहीची हत्या आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येऊन हल्लेखोर राकेश तिवारी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
महाविकास आघाडीच्यावतीने हल्लेखोर वकील राकेश तिवारी याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियामाअंर्तगत देश द्रोहासारखे कडके गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीचादेखील या निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवत्तäया अॅड. जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, सुनिल सपकाळ, डॉ. इसरार, दिलीपराव जाधव, गणेश पाटील, अॅड. अनंतराव वानखेडे, चिखली विधानसभा समन्वयक प्रा. राजू गवई, माजी जि.प. सदस्या डॉ. ज्योतीताई खेडेकर, ईश्वराराव इंगळे, रामभाऊ खेडेकर, धोंडीराम खंडारे, नंदूभाऊ कर्हाडे युवा सेना जिल्हा प्रमुख, नंदकिशोर शिंदे, प्रदेश प्रवक्ते विश्वदीप पडोळ, अशोक गव्हाणे, शिवराज पाटील, देवानंद पवार, डॉ. सतेंद्र भुसारी, लखन गाडेकर, दत्ताभाऊ काकस, सुनिल तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरन्यायाधीश गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे सामाजिक समता, आणि संविधानिक संस्थांनाच गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. हा एका व्यक्तीवरील हल्ला नसून स्वतंत्र भारताची धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकता व अखंडता यावर केलेला प्रहार आहे. हा हल्ला धार्मिक उन्माद, जातीय विषमत्ता आणि मनुवादी विचारसरणीच्या मानसिकतेचा परिणाम असल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले. जे संविधानाचे रक्षण करतात, जे अन्यायाविरुद्ध उभे राहतात. त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. हा देश छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, न्यायाचा आहे, समानतेचा आहे. कुणाच्याही जाती-धर्माच्या अहंकाराचा नाही. ‘आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रसेनजित पाटील म्हणाले.
यावेळेस निवेदनावर भाई प्रदीप अंभोरे, जाकीर कुरेशी, आशाताई गोंड, विश्वास भालेराव, प्रमोद सपकाळ, तुळशीराम नाईक, संताराम तायडे, सुमित सरदार, श्याम पठाडे, दीपक रिंढे, राहुल सवडतकर, रामभाऊ जाधव, अमोल खेडेकर, दीपक म्हस्के, डॉ. पुरूषोत्तम देवकर, प्रदीप देशमुख, प्रभाकर वाघ, अॅड. भाऊराव भालेराव, अतिष कासारे, कलीम खान, शैलेश बावस्कर, कदीरोद्दीन अजिजोद्दीन, तुळशीराम काळे, अनिल वर्मा, महादेव शेळके, रवि पाटील, अॅड. पी. एम. जाधव, बबनराव जाधव, गफ्फार खान, प्रदिप पचेरवाल, विजय निकाळजे, अमर कुळे, सुरेश जाधव, बबलू कुरेशी, तुषार खरे, मुजाहीद सैय्यद, अबुलैस शेख, गजानन भिवसनकर, मनोज जाधव, विजय कड, रविंद्र भाकरे, नितीन गायकवाड, उत्तमराव बाजड, अंबादास वाघमारे, सै. ईकबाल , शे. शफीक, महेंद्र गवई, नारायण हेलगे, सुनिल पनपालिया, राजेश जाधव, जिवन जाधव, ज्ञानेश्वर शेजोळे, प्रल्हाद पालकर, अॅड. राजीव जाधव, श्याम पवार, प्रशांत भटकर, श्रीकृष्ण मोरे, विठ्ठल चव्हाण, प्रकाश राठोड, सै. सुफीयान, आदींसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.