साखरखेर्डा – येथील प्रतिष्ठित व्यापारी भगवान आप्पा बेंदाडे यांचे काल, दि. ७ ऑक्टोबररोजी दुपारी पाच वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वस्तरातून शोक व्यक्त होत आहे.
साखरखेर्डा येथील भगवानआप्पा आसारामआप्पा बेंदाडे वय ७० वर्ष यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांचा मातीचा कार्यक्रम आज वीरशैव स्मशानभूमीमध्ये सकाळी पार पडला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक छोटासा व्यवसाय थाटून, किराणा दुकान व्यवसाय करीत होते. त्यानंतर बदलत्या काळानुसार व्यवसाय करीत आपला प्रपंच सांभाळीत सामाजिक कार्यात अग्रेसर होते. काही दिवसांपूर्वी ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.