– यंदाचा शताब्दी महोत्सव; महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने १६ ऑगस्टला सांगता
– संयोजकांकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू!
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – श्री संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेला व गुरूवर्य भीमसिंह महाराज यांनी चालवलेला श्री गोपाल कृष्ण जयंती उत्सव निमित्ताने बालमटाकळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवास दि.९ ऑगस्टरोजी प्रारंभ होऊन दि. १६ ऑगस्टला सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
शताब्दी महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ७ अधिष्ठान देवता पूजन, विष्णूसहस्त्रनाम, रामकृष्ण हरी मंत्र जप, ७ ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी २ ते ५ श्रीकृष्ण लीलामृत कथा, ५ ते ६ हरिपाठ, सायं. ७ ते ९ हरिकीर्तन, रात्री ९ ते ११ संगीत भजन, ११ ते ४ जागर, दररोज श्रीकृष्ण लीलामृत कथा प्रवक्ते ह.भ.प.गुरूवर्य ज्ञानेश्वर माऊली जोग महाराज अ.वा.शि. संस्था, आळंदी यांच्या अमृत वाणीतून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह.भ.प.योगेश महाराज गोरे (आळंदी), ह. भ. प. राजाराम महाराज काटे तर रोज सायं. ७ ते ९ वाजता कीर्तन सेवा तर रात्री ९ ते ११ संगीत भजन संपन्न होणार आहे. शताब्दी महोत्सवात नामांकित महाराजाची कीर्तन सेवा संपन्न होणार असून, दि.९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. केशव महाराज नामदास श्री संत नामदेव महाराज वंशज, रविवार दि.१० रोजी खान्देशरत्न वैराग्यमूर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर, सोमवार दि.११ रोजी ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले गाथा मंदीर श्रीक्षेत्र देहू, मंगळवार दि.१२ रोजी ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली (आळंदी देवाची), बुधवार दि.१३ रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामराव महाराज ढोक नागपूर, गुरूवार दि. १४ रोजी ह.भ.प.श्री.उद्धव महाराज मंडलिक श्री नारायणगिरी आश्रम, नेवासा तर शुक्रवार दि.१५ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्री.शब्दप्रेमी संग्रामबापु भंडारे भंडारा डोंगर, देहू तर शुक्रवार दि.१५ रोजी भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव निमित्त कीर्तन सेवा रात्री १० ते १२ वा. ह.भ.प. गुरूवर्य राम महाराज झिंजुके श्री जोग महाराज संस्थान तर शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री भगवानगड यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप होणार आहे. तसेच संगीत भजन रात्री ९ ते ११ वा. शनिवार दि.९ रोजी ह.भ.प.श्री.राहुल महाराज खरे विजेता गौरव महाराष्ट्राचा, इंडियन आयडॉल फेम रविवार दि.१० रोजी ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देवढे (आळंदी) इंडियन आयडॉल फेम सोमवार दि.११ रोजी सौ. ज्योती गोराणे ह.भ.प.श्री. रामेश्वर देशमुख पं. गुरुवर्य श्री सुरेशजी वाडकर यांच्या शिष्या साम मराठी फेम महाराष्ट्र संगीत गुरुकुल संगीत संयोजन-सुप्रसिद्ध तबलावादक श्री श्यामजी गोरा, आळंदी मंगळवार दि.१२ रोजी डॉ. निरज लांडे, अकोला तबला साथ प्रसाद लोहार बुधवार दि.१३ रोजी गुरुवर्य पं. कल्याण गायकवाड, आळंदी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कंठ संगीतरत्न कौस्तुभ गायकवाड मृदुंग साथ गंभीर म. अवचार महाराष्ट्राचा गायक पुरस्कार झी टॉकी सबलासाथ महादेव सगळे गुरूवार दि. १४ रोजी अभिनय संघर्ष पं. रघुनाथजी खंडाळकर, पुणे साथ संगत श्री. सुरंजन खंडाळ सुप्रसिद्ध तबला वादक श्री. पांडुरंगजी पवार भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी युवा गायक पुरस्कार विजेता शुक्रवार दि.१५ रोजी प्रा. राजेश सरकटे छत्रपती संभाजीनगर गजर विठ्ठलाचा (भक्ती संगीत) याप्रमाणे कार्यक्रम ह.भ.प. गुरुवर्य राम महाराज झिंजुके श्री. जोग महाराज संस्थान, आखेगाव यांच्या नेतृत्वाखाली हा शताब्दी महोत्सव संपन्न होणार असून, भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.