– उत्तुंग भरारी घ्यायला शिकवणारा उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करू : राहुल बोंद्रे
चिखली (राजेश लोखंडे) – दहीहंडी हा कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भारतात साजरा केला जाणारा सर्वांत महत्त्वाचा सांस्कृतिक खेळ आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक खेळात त्याचे रूपांतर झाले आहे. उंच मनोरे रचणे, हे गोविंदा पथकांच्या सांघिक प्रयत्नांचे, कौशल्याचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. उत्तुंग भरारी घ्यायला शिकवणारा दहीहंडी उत्सव या वर्षीही गुण्यागोविंदाने साजरा करू, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
बुधवार दि. ३० जुलै रोजी छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठान आणि चिखली तालुका व शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी बैठक मोठ्या उत्साहात परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान चिखली येथे पार पडली. यावेळी राहुल बोंद्रे बोलत होते. या बैठकीत दहीहंडी साजरी करताना घ्यावयाची सुरक्षा, वेळापत्रक, कार्यक्रमाची रूपरेषा, सांस्कृतिक कार्यक्रम, गोविंदा पथकांच्या सुविधा, पुरस्कार योजना, व इतर महत्वाच्या बाबींची सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यंदाही चिखली शहरात भव्य आणि मानाची दहीहंडी साजरी व्हावी, हा संकल्प छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठान आणि चिखली तालुका व शहर युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. तर कार्यक्रमाचा सुसूत्र व यशस्वी आयोजनसाठी सर्वांनी एकमताने पुढाकार घेतला, हे विशेष..! याप्रसंगी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, पांडुरंग पाटील भुतेकर, विष्णू पाटील कुळसुंदर, दीपक देशमाने, राहुल सवडतकर, कुणाल बोंद्रे, अतरोद्यीन काझी, प्रा. राजु गवई सर, प्रा.निलेश गावंडे सर, रिक्की काकडे, प्रमोद पाटील, रामदास मोरे, किशोर कदम, प्रदिप पचेरवाल, कैलास खराडे, सचिन शेटे, समाधान आकाळ, बिदुसिंग इंगळे, जय बोंद्रे, डॉ. अमोल लहाने, शहीजादभाई, शिवराज पाटील, राजु रज्जाक, गोकुळ शिंगणे, बंडुभाउ कुळकर्णी, ईश्वरराव इंगळे, जाकीर शेख, आरिफ बागवान, डॉ. संजय घुगे, रमजान चैधरी, विजु पाटील शेजोळ, शेख खैरू, आत्माराम देशमाने, दयानंद खारात, मनोज लाहुडकर, मिलींद पालवे, समाधान आकाळ, अशोकराव आंभोरे, शेषराव आंभोरे, मनोज जाधव, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, डिगांबर देशमाने, दिलीप खंदलकर, रविअण्णा काळे, जगन्नाथ उंबरकर, गोकुळसिंग पवार, अंबादास वाघमारे, विजय वाघमारे, सुभाषसेठ करंडे, रोहण पाटील, राजेश खरात, परमेश्वर साळवे, रूपेश घोलप, रवि महाजन, सोहिल शेख, दिलीप नरवाडे, जिवनबापु देशमुख, नजिरसेठ कुरेशी, जगन्नाथ वाघ, पुरूषोत्तम हेलगे, सदुनाना ठेंग, शेख अन्सार भाई, आंबादास तायडे, अकिल खान, विजय सोनवाल, पप्पु जागृत, आनंथा जाधव, सतिष काळे, शेख अजिम, नितीन वाघ, सतोष क-हाडे, भिका पाटील, संजु पाटील, राजु सावळे, लक्ष्मण भिसे, गणी भाई, सतिष जगताप, सिध्दु पाटील, कापरसिंग पाटील, दशरथ सिरसागर, छोटू खलसे, गजानन वांजोळ, गजानन जवंजाळ, भगवान गायकवाड, विठल सोनुने, सुनिल म्हस्के, राहुल व्यवहारे, गुलाब आंभोरे, शिवलाल चव्हाण, समाधान सुरडकर, प्रमोद साळवे, शुभम बुरकुल, अशोक झगरे, पवन पाटील, सुभाष सोनुने, नाना झुबंड, चांगदेव खरात, सुरेश तायडे, व्यंकटेश रिंढे, विजय येवले, दत्तात्रय येवले, विष्णु खांबाईतकर, भारत गायकवाड, शकील भाई, अज्जु भाई यांच्यासह चिखली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच शहरातील विविध गोविंदा पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.