बुलडाणा(ब्रेकिंग महाराष्ट्र):- महागाई , बेरोजगारी यांसह शेतकरी व जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करून केंद्रातील भाजप सरकार ईडी, सीबीआय इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा कट असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विचार संपूर्ण राज्यात पोहोचविण्याचे काम या आजादी गौरव पदयात्रेच्या माध्यमातून आपण करीत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पदयात्रेच्या माध्यमातून ध्येय धोरणे घराघरापर्यंत पोहोचणार आहे तसेच आज केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना काय मिळाले महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्याकडे दुर्लक्षित करीत आहे. आहे अशा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी आगामी काळात जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीशी जनतेने भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी केले आहे.
भारतीय भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्षे व अमृत महोत्सवी वर्ष 2022 च्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने राज्यात आझादी गौरव पदयात्रा क्रांती दिनी 9 ऑगस्ट पासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे. या आझादी पदयात्रेचे 10 ऑगस्ट रोजी मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे आगमन झाले. याप्रसंगी भारतीय काँग्रेसच्या वतीने आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या पदयात्रेत या पदयात्रेत काँगेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, बुलढाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, बुलढाणा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, लक्ष्मणराव घुमरे, डॉ.अरविंद कोलते, ॲड. साहेबराव मोरे, हाजी रशीद खाँ जमादार, माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ, श्याम कुमार राठी, राजेंद्र वाडेकर, मनोज देशमुख, दिलीप देशमुख, बंडू चौधरी, राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दाताळा येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणातून या आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात करून ही पदयात्रा मलकापूर शहरात दाखल होवून शहरातील मुख्य मार्ग काढत व स्वातंत्र्य सेनानी व महामानवांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत व अभिवादन केले . या पदयात्रेचा समारोप स्थानिक भातृ मंडळ येथे जाहीर सभेत करण्यात आला.
यावेळी मंचावर आमदार राजेश एकडे, धनंजय देशमुख, हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, राहुल बोंद्रे, ॲड.हरीश रावळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर घणाघाती टीका करीत भारतीय संस्कृतीत जे आशीर्वाद घेतात किंवा पाया पडतात त्यांना संस्कृती बोलल्या जाते. मात्र जे त्यांच्या पाया पडतात त्यांनाच संपविण्याचे काम त्यांनी केले. अशी परखड टीका व आरोप नाव न घेता पंतप्रधान मोदी यांच्यावर केला. तसेच भाजपच्या विरोधात जो कोणी बोलले त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सारख्या केंद्रीय संस्था मागे लावून , खोटे गुन्हे दाखल करून त्यांना संपविण्याचे काम भाजप व केंद्र सरकार करीत आहे. हे भाजप सरकार हे इंग्रज काळातील सरकार असल्याचा या कारवाया मधून स्पष्ट स्पष्ट दिसून येते. त्यांच्या या हुकुमशाही विरुद्ध आता लढा देण्याची गरज असून प्रत्येक महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणे हा त्यांचा अवमान करणे म्हणजेच यांना आलेली सत्तेची मस्ती असल्याचीही नाना पटोले यांनी सांगून केंद्र व राज्यातील सरकारचा खरपूस समाचार घेतला. आझादी गौरव पदयात्रेच्या प्रास्ताविकात बोलताना आमदार राजेश एकडे त् यांनी आझादीच्या संघर्षात काँग्रेसचे मोठे योगदान असून महात्मा गांधी यांनी क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी ‘चले जाव’ नारा देऊन इंग्रजांना या देशातून हद्दपार करण्याकरिता पदयात्रा सुरू केली होती. त्याच धर्तीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राज्यात आझादी गौरव पदयात्रा सुरू करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या व विरोधात बोलणाऱ्या विरुद्ध केंद्रातील भाजप सरकार द्वेष भावनेतून कार्य करीत असल्याचा आरोप करीत निषेध केला. तर या पदयात्रेच्या माध्यमातून राज्यातील तमाम शेतकरी व जनसामान्याचे प्रश्न, महाराष्ट्रातील बिघडलेली राजकीय परिस्थिती व प्रमुख मागण्या दुर्लक्ष करीत असलेले भाजप शिवसेना ( शिंदे गट) युती सरकारचा समाचार घेतला.
त्यानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी बोलताना काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी काँगेसची असून गेल्या 52 वर्षात आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा फडकला नाही. आणि आता तेच लोक तिरंग्याबाबत बोलत आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नसून अशा लोकांपासून व त्यांनी सुरू केलेल्या अपप्रचाराला बळी न पडता जनतेने सावध राहावे, असे यावेळी राहुल बोंद्रे यांनी सांगितले. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना आरएसएसच्या मुख्य कार्यालयात आजपर्यंत तिरंगा फडकलेला नाही. मात्र आरएसएसच्या मुख्यालयात जावून नागपूरच्या तिघांनी हिंमत दाखवित तिरंगा लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता आरएसएसच्या मुख्य कार्यालयात तिरंगा फडकावावा लागत आहे. हे काँग्रेसचे यश असून त्यांचे व भाजपचे हे प्रेम बेगडी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्यात जातीपातीचे राजकारण करून व जनतेची दिशाभूल करून केंद्र व राज्यातील सरकार जनतेची दिशाभूल करून फसवणूक करीत आहे, असा आरोप यावेळी सपकाळ यांनी भाजप व केंद्र आणि राज्य सरकारवर केला. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध आघाड्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.