आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी पुनर्निवड झालेले योगेश देसाई यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन, त्यांना संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी दर्शनाचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण राष्ट्रपतींनी सहर्ष स्वीकारले आहे. यावेळी राष्ट्रपतींना माऊलींची मूर्ती, गाथा, ज्ञानेश्वरी भेट देऊन त्यांचा सत्कारही श्री देसाई यांनी केला.
या भेटीप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची पुढील एक वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेत, त्यांना आळंदी भेटीचे निमंत्रण दिले. याप्रसंगी देसाई यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचाही सत्कार केला.
राष्ट्रपतींना आळंदी भेटीचे निमंत्रण!