चिखली ( राजेश लोखंडे ) – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणे या अनुषंगाने होतकरू गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या आणि शालेय वस्तू वाटप करण्याच्या कार्यक्रम शिवसंग्राम पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव लंबे पाटील यांच्या वतीने दि. ३० जून २५ रोजी जिल्हा परिषद शाळा माळखेड येथे आयोजित करण्यात आला होता. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण सर्वोतोपरी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, असे आश्वासन भगवानराव लंबे पाटील यांनी दिले.
शाळेच्या प्रगतीची वाटचाल बघून सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक तसेच अनंत शेळके सरांनी घेतलेल्या कष्टामुळे दोन दशकापासून माळखेड येथील सुसंकृत विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगत सौ. वर्षा भगवान लंबे यांनी सरांच्या कार्याला कौतुकाचा उजाळा दिला. यावेळी मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि गावातील मंडळी उपस्थित होती.