– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ.रायमुलकरांनी शेतकर्यांना दिला शब्द!
– मेहकर तालुक्यातील नुकसानीची केली शेतात जाऊन पाहणी!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – आम्ही कायम शेतकर्यांच्या पाठीशी असतो, त्यामुळे ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकर्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शासनाकडे जोरकस पाठपुरावा करू, प्रसंगी शासनाला भांडू असा शब्द केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिला. ढगफुटीसदृश पावसामुळे मेहकर व लोणार तालुक्यातील झालेल्या नुकसानीची ना. जाधव व माजी आमदार डॉ.रायमुलकर यांनी गेले दोन दिवस पाहणी केली असता, शेतकर्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कालही त्यांनी मेहकर तालुक्यात पाहणी दौरा करून शेतकर्यांना धीर देत नुकसानभरपाईचे आश्वासन दिले. तसेच, प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशित केले.
दि. २५ व २६ जूनरोजी मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला, या पावसामुळे शेती, पिके, पेरलेले बियाणे तसेच काही घरांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. नदी, नाल्यांना पूर गेल्याने नदीकाठची जमिनीही खरडून गेली आहे. एकट्या मेहकर तालुक्यात जवळपास ८० हजार एकरच्यावर जमिनीवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. दि. २९ जूनरोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व व माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मेहकर तालुक्यातील फर्दापूर, गौंढाळा, कंबरखेड, घोंसर, नायगाव दत्तापूर, मेळजानोरी, जानेफळ, मोसंबे वाडी, मिस्कीनवाडी, मारोतीपेठ, उटी, देऊळगाव साखरशासह इतर भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आम्ही शेतकर्यांच्या पाठीशी नेहमीच असतो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरीव मदत शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी जोरदार पाठपुरावा करत, प्रसंगी शासनाला भांडू, असा शब्द त्यांनी यावेळी शेतकर्यांना दिला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी दिनकर खरात, दिलीपराव देशमुख, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी विजय सरोदे, कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, मोहन धोटे, रामेश्वर भिसे, राजू काटे, अमर राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस. अंभोरे, नायगाव दत्तापूर ग्रामपंचायत अधिकारी शेषराव शिंदे तसेच देऊळगाव साकरशा येथे सरपंच संदीप अल्हाट, ग्रामपंचायत सदस्य रणजित देशमुख, बी. एम. राठोड, पत्रकार गणेश पाटील, शाखाप्रमुख दिलीप नवत्रे, शे.गफ्फार कुरेशी, अरूण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शे.अबरार, प्रभाकर वानखडे, विपुल देशमुख, रमेश आमले, भिकाजी गायकवाड, सागर पायघन, ओम सोनोने, प्रमोद पाटील, हमीदबेग मिर्झा, बल्लूशेठ नहार, देविदास समुद्रवार, परशराम अल्हाट, कृष्णा चव्हाण, रमेश बाजड, गणेश अल्हाट, तलाठी बालाजी माने, सहाय्यक कृषी अधिकारी सिरसाठ, ग्रामपंचायत अधिकारी बाळू म्हस्के, सचिन सावजी, शेख राजीकसह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
