Pachhim Maharashtra

बहुभाषिक भाऊ-बाबा वंजारी संघाचा उद्या पुण्यात राज्यस्तरीय मेळावा

पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाचा राज्यस्तरीय मेळावा यंदा पुण्यात दिनांक १० ऑगस्टरोजी सकाळी ११ ते ३.०० वाजेदरम्यान महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या संघाच्या संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीताई गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ नेते तोताराम कायंदे (सिंदखेडराजा) यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली होणार्‍या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून, जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजपचे प्रवक्ते तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ हे उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले जाणार आहे. तसेच, मेळाव्यास डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज संस्थापक, मानवकल्याण मिशन, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज खेडकर घाटशिल पारगांव, बीड, डॉ. तुकाराम नेहरकर घाटशिल पारगांव, बीड, नंदु सानप संस्थापक वसंत सोशल फाऊंडेशन, नाशिक, सौ. स्वातीताई मोराळे राष्ट्रीय अध्यक्षा, ओबीसी फाऊंडेशन, इंडिया, सौ. रुपालीताई ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता, पुणे, नागनाथ गुट्टे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचे निमंत्रक सौ. लक्ष्मीताई मरकळ, पुणे, सूर्यकांत मुंढे, बीड, रामकिसन बोडके, जालना, सिताराम घुले, परभणी, दादाराव दहिफळे, सौ. शोभाताई दहिफळे, सुभाष बड़े, अहमदनगर,राजेंद्र वनवे, मुंबई, विष्णुदास चेमटे, पुणे, संदीप घुगे, अहमदनगर हे आहेत. तरी या मेळाव्यास बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्षांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!