– चिखली येथील खामगाव चाैफुली येथील घटना; काहीकाळ वाहतूक विस्कळीत!
चिखली (महेंद्र हिवाळे) – येथील खामगाव चौफुली येथे दि. २४ मे २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. गजानन रामेश्वर बुळे (वय ३१, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. शिवणी खांबा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव टिप्परने त्यांच्या पीकअपला उडवून दिले. त्यात त्यांचे 8 हजाराचे नुकसान झाले असून, या घटनेने वाहतूक बराचवेळ विस्कळीत झाली हाेती.
मिळालेल्या माहितीनुसार, MH-10CR-2078 क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या टिप्पर चालकाने आपले वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या MH-38X-3362 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअपला मागच्या बाजूने जोराची धडक दिली. या धडकेत पिकअपचे समोरील काच तसेच पाठीमागील डंपर फुटले आणि वाहनातील आंब्याच्या क्रेट्स खाली पडून अंदाजे ८,००० रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय नवीन दंड संहिता (BNS) अंतर्गत कलम 281 व 324(4) अन्वये अपघात क्रमांक 394/25 नोंदवण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव हे करत आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.