फ्रीज, कुलर, कपाट, खुर्चीसह सर्व वृद्धांना दिले भोजन
चिखली/बुलढाणा (राजेश लोखंडे) – गेल्या पंचवीस वर्षांपासून पतीचे छत्र डोक्यावरून हरवल्याने निराश न होता, हिम्मत न हारता, चार मुलीचे शिक्षण करून चांगल्या घरी लग्न लावून दिले. आज चारही जवाई हे सासूला आईप्रमाणे जीव लावतात. या आईने पती कालकथीत अशोक खिल्लारे (वायरमन) यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त निराधार बेघर वयोवृद्धांची सेवा करीत असलेल्या मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकरीता प्रâीज, कुलर, कपाट, खूर्ची व भोजनदान देऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.
कालकथीत अशोक खिल्लारे हे विद्युत महामंडळामध्ये कर्तव्यात असतांना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा आप्त परिवार असतांना त्यांच्या पत्नी लताबाई अशोक खिल्लारे यांनी चारही मुलींना उच्च शिक्षण देऊन चांगल्या परिवारात विवाह करून दिले. त्यांनी वृद्धाच्या उर्वरित जीवनात काहीसा क्षण आनंद द्यावा, या हेतूने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीद्वारा संचलित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर येथे निराधार, बेघर, घरातून काढून दिलेले ज्यांना मुले- मुली व इतर नातेवाईक असूनसुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही, असे आजी, आजोबा यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकरच्या वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकरिता थंड पाणी, पालेभाजी टवटवीत राहण्यासाठी प्रâीज, तर उन्हाळ्यात थंड हवेचा आस्वाद मिळण्यासाठी कुलर, तसेच कपडे नीटनिटके राहण्यासाठी कपाट व सर्वाना एक दिवसाचे भोजन अशी भरीव मदत प्रा. डॉ. सुभाष राऊत यांच्या माध्यमातून खिल्लारे परिवाराच्यावतीने देण्यात आली.
यावेळी प्रा.डॉ. सुभाष राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लता अशोक खिल्लारे, कुसुमबाई खंदारे, ज्ञानेश्वर हिवाळे, कविता हिवाळे, शिवनारायण गवई, वनिता गवई, नीलेश हिवाळे, ललिता हिवाळे, आकाश गवई, सुजाता गवई हे उपस्थित होते. खिल्लारे परिवाराने केलेल्या भरीव मदतीबद्दल संचालक प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त करीत, कुठेही निराधार बेघर वयोवृद्ध आढळून आल्यास तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करावे, असे आवाहन केले आहे.